Family Link पालक नियंत्रणे हे पालकांसाठी Family Link चे सहयोगी ॲप आहे. कृपया फक्त लहान मूल किंवा किशोराद्वारे वापरल्या जाणाऱ्या डिव्हाइसवर हे ॲप डाउनलोड करा.
Google चे Family Link पालक नियंत्रणे ॲप वापरून पहा. तुमची मुले लहान असोत किंवा किशोरवयीन, त्यांना ऑनलाइन शिकताना, खेळताना आणि एक्सप्लोर करताना मार्गदर्शन करण्यात मदत करण्यासाठी, Family Link ॲप तुम्हाला तुमच्या स्वतःच्या डिव्हाइसवरून रिमोट पद्धतीने डिजिटल मूलभूत नियम सेट करू देते. Family Link तुम्हाला १३ (किंवा
तुमच्या देशामधील लागू संमती वय
) वर्षांखालील लहान मुलांसाठी, तुमच्या खात्यासारखेच बहुतांश Google सेवांचा ॲक्सेस असलेले Google खाते देखील तयार करू देते.
तुम्ही Family Link पालक नियंत्रणे वापरून पुढील गोष्टी करू शकता:
त्यांना चांगला आशय शोधण्यात मदत करणे
• त्यांची ॲप ॲक्टिव्हिटी पहा - सर्व स्क्रीन वेळ सारखा नसतो. तुमची लहान मुले त्यांच्या आवडत्या ॲप्सवर किती वेळ घालवत आहेत हे दाखवणाऱ्या ॲक्टिव्हिटी अहवालाच्या मदतीने, त्यांनी त्यांच्या Android डिव्हाइसवर काय करावे याबद्दल योग्य निर्णय घेण्यात त्यांना मदत करा. तुम्ही दैनिक, साप्ताहिक किंवा मासिक अहवाल पाहू शकता.
• त्यांची ॲप्स व्यवस्थापित करा - सुलभ सूचना तुमच्या लहान मुलाला Google Play Store वरून डाउनलोड करायची असलेली ॲप्स तुम्हाला मंजूर किंवा ब्लॉक करू देतात. तुम्ही स्वत:च्या डिव्हाइसवरून रिमोट पद्धतीने त्यांच्या डिव्हाइसवरील ॲपमधील खरेदी व्यवस्थापित करू शकता आणि विशिष्ट ॲप्स लपवूदेखील शकता.
• त्यांच्या उत्सुकतेला प्रोत्साहन द्या - तुमच्या लहान मुलासाठी कोणती ॲप्स योग्य आहेत हे ठरवणे कठीण असू शकते, त्यामुळे Family Link हे तुम्हाला Android वर शिक्षकांनी शिफारस केलेली ॲप्स दाखवते, जी तुम्ही त्यांच्या डिव्हाइसवर थेट जोडू शकता.
स्क्रीन वेळेवर लक्ष ठेवणे
• मर्यादा सेट करा - तुमच्या लहान मुलाला नेमका किती स्क्रीन वेळ द्यायचा हे तुम्ही ठरवू शकता. Family Link हे तुम्हाला त्यांच्या पर्यवेक्षित डिव्हाइससाठी वेळ मर्यादा आणि झोपण्याची वेळ सेट करू देते, जेणेकरून तुम्ही त्यांना संतुलन साधण्यात मदत करू शकता.
• त्यांचे डिव्हाइस लॉक करा - बाहेर खेळण्याची वेळ असो, रात्रीचे जेवण असो किंवा फक्त एकमेकांसोबत वेळ घालवणे असो, ब्रेक घेण्याची वेळ असते, तेव्हा तुम्ही पर्यवेक्षित डिव्हाइस रिमोट पद्धतीने लॉक करू शकता.
ते कुठे आहेत ते पाहणे
• तुमची लहान मुले फिरतीवर असतात, तेव्हा त्यांना शोधता येणे महत्त्वाचे आहे. त्यांचे Android डिव्हाइस त्यांच्यासोबत आहे, तोपर्यंत त्यांना शोधण्यासाठी तुम्ही Family Link वापरू शकता.
महत्त्वाची माहिती
• तुमच्या लहान मुलाच्या डिव्हाइसनुसार Family Link ची टूल वेगळी असतात. कंपॅटिबल डिव्हाइसची सूची families.google.com/familylink/setup येथे पहा
• Family Link तुम्हाला तुमच्या लहान मुलाची Google Play वरील खरेदी आणि डाउनलोड व्यवस्थापित करण्यात मदत करत असले, तरीही (परवानग्या विस्तारित करणाऱ्या अपडेटच्या समावेशासह) ॲप अपडेट, तुम्ही यापूर्वी मंजूर केलेली ॲप्स किंवा कुटुंब लायब्ररी मध्ये शेअर केलेली ॲप्स इंस्टॉल करण्यासाठी त्यांना मंजुरीची आवश्यकता नसेल. पालकांनी त्यांच्या लहान मुलाची इंस्टॉल केलेली ॲप्स आणि ॲप परवानग्या यांचे Family Link मध्ये नियमितपणे पुनरावलोकन केले पाहिजे.
• तुम्ही तुमच्या लहान मुलाच्या पर्यवेक्षित डिव्हाइसवरील ॲप्सचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करून त्यांनी वापरू नयेत अशी तुम्हाला वाटणारी ॲप्स बंद केली पाहिजेत. नोंद घ्या, की तुम्हाला आधीपासून इंस्टॉल केलेली काही ॲप्स कदाचित बंद करता येणार नाहीत.
• तुमच्या लहान मुलाच्या किंवा किशोराच्या डिव्हाइसचे स्थान पाहण्यासाठी, ते सुरू असणे, अलीकडे ॲक्टिव्ह असणे आणि इंटरनेटशी कनेक्ट केलेले असणे आवश्यक आहे.
• शिक्षकांनी शिफारस केलेली ॲप्स ही फक्त यूएसमधील Android डिव्हाइसवर ठरावीक वयाच्या मुलांच्या पालकांसाठी उपलब्ध आहेत.
• Family Link हे तुमच्या लहान मुलाचा ऑनलाइन अनुभव व्यवस्थापित करण्यासाठी टूल पुरवत असले, तरीही त्यामुळे इंटरनेट सुरक्षित होत नाही. उलट, ते पालकांना त्यांच्या मुलांनी इंटरनेट कशाप्रकारे वापरावे याची निवड करू देण्यासाठी आणि इंटरनेटच्या वापरासंबंधित संभाषणाला प्रोत्साहन देण्यासाठी आहे.